Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळकेतील कृष्णा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले !
    क्राईम

    जळकेतील कृष्णा ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले !

    editor deskBy editor deskJune 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरातील कृष्णा ज्वेलर्स रात्री १२ते२:१५च्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची घटना सकाळी उघडकीस आली या घटनेची माहिती आज सकाळी ५:१५च्या सुमारास वसंतवाडी गावाचे सरपंच विनोद पाटील यांनी जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे यांना तसेच कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील यांना दुरध्वनी द्वारे त्याचं दुकानाचे शटर व चॅनल उघडे असुन चोरी झाल्याचे दिसून येत आहे असे सांगितले माहिती मिळताच कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील हे आपल्या दुकानावर आले त्यांनी दुकानावर येऊन दुकानाची स्थिती पाहिली त्यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली त्यांच्या दुकानातील लोखंडाच्या तिजोरीसह चोरट्यांनी सुमारे २४००ग्रॅम वजनाचे चांदी अंदाजीत किंमत २१५०००व १००००रुपये रोकड तसेच दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचे सि प्लस कंपनीचे डी.व्ही.आर किंमत १००००रुपये असे अवज चोरट्यांनी लांबवले या घटनेची माहिती जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे यांनी औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशन जळगाव यांना कळविली त्यांनंतर म्हसावद येथील पोलिस चौकशीला असलेले हे.कॉ.आबा महाजन व पो.कॉ.बच्छाव हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी केली व सदर घटनेची माहिती औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना कळविली माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे आपल्या वरिष्ठ जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह घटना स्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली त्यावेळी कृष्णा ज्वेलर्स येथे यापूर्वी ही दोन वेळा चोरी झाल्याचे समोर आले आहे. घटना स्थळी वरिष्ठांसह औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या डी बी विभागाचे अतुल वंजारी व कर्मचारी उपस्थित होते.

    कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील यांनी औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर घटना स्थळी डॉग पथक,ठसे तज्ञ व फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली यावरून तपासाचे चक्र गतिमान केल्याचे दिसून येत आहे असे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे व लवकर चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिस यंत्रणेला येईल असा आशावाद व्यक्त होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.