Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू ; आरोपी अटकेत !
    क्राईम

    हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू ; आरोपी अटकेत !

    editor deskBy editor deskJune 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील खोटे नगर परिसरात दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने मित्रानेच धारदार शस्त्र मारून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. सुरूवातीला हल्ल्यात तरुण अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र बुधवारी पहाटे तरुणाची प्राणज्योत मालवल्याने पोलिसांनी या प्रकरणी खुनाचे कलम वाढवत तिघांना अटक केली. अविनाश निंबा अहिरे (35, कुसूंबा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगराजवळील अंडाभूर्जीच्या गाडीवर अविनाश हा चारचाकी (एम.एच.19 ई.ए.0451) वरून मित्रासोबत आल्यानंतर संशयितदेखील आले. अविनाशची दुचाकी संशयित दीपककडे होती मात्र दुचाकीची चावी हरवल्याने अविनाशने त्याबाबत दीपकला विचारणा केल्यानंतर चावी शोधत आहे, असे संशयिताने सांगितल्यानंतर शाब्दीक वाद वाढत गेल्याने दीपकसह अन्य दोघांनी धारदार शस्त्र भोसकल्याने अविनाश हा गंभीर जखमी झाला. अत्यवस्थ अवस्थेत त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अविनाश अहिरे या तरुणाच्या खून प्रकरणी महेश पोपट सोनवणे (चंदूअण्णा नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित दीपक प्रकाश पाटील, साहिल खान, अमोल गवळी (पिंप्राळा, जळगाव) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यापूर्वी या गुन्ह्यात भादंवि 307 लावण्यात आले असलेतरी नंतर तरुणाचा मृत्यू झाल्याने त्यात 302 कलम वाढवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड व तुषार जोशी यांनी तिघा आरोपींना अटक केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.