Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री पदासाठी राज्यातील भाजप ६ आमदार अडकले ‘मनी ट्रप’मध्ये !
    क्राईम

    मंत्री पदासाठी राज्यातील भाजप ६ आमदार अडकले ‘मनी ट्रप’मध्ये !

    editor deskBy editor deskMay 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था 

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजपच्या सहा आमदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रीपदासाठी ‘मनी ट्रप’च्या या प्रकाराचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुजरातमधील मोरबी येथून नीरजसिंग राठोड याला ताब्यात घेतले.

    महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक आमदारांनी त्यासाठी लॉबिंगही सुरू केले आहे. त्यातच मंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने नीरजसिंह राठोड या तोतयाने चक्क नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून भाजप आमदारांना फसवले. भाजपचे नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना फोन करून या तोतयाने लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तुम्हाला नगरविकास मंत्रीपद देण्यात येईल. त्यासाठी पक्ष निधी म्हणून 1 कोटी 67 लाख रुपयांची मागणी करत त्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. कुंभारे यांनी आपल्याला फोन करणाऱ्याबाबत अधिक माहिती घेतली असता राठोड नावाची कुणीही व्यक्ती नड्डा यांचा पीए किंवा जवळची नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर कुंभारे यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
    आमदार विकास कुंभारे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा पोलिसांकडे सोपविला. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे नीरजचा शोध घेतला. नीरज हा अहमदाबाद येथील मोरबीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक मोरबी येथे गेले आणि मंगळवारी रात्री नीरज याला अटक करून नागपूरला आणले. नीरजसिंह राठोड यांच्या प्राथमिक चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विकास कुंभारे यांच्याप्रमाणे महाराष्ट्र आणि गोव्यातील आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती पुढे आली आहे.

    नीरजसिंह राठोड यांनी आपणच खरेखुरे जे. पी. नड्डा यांचे पीए आहोत हे पटवून देण्यासाठी आपल्या एका साथीदाराला नड्डा केले. सापळय़ात सापडलेल्या आमदारांचे फोनवरून तोतया नड्डासोबत बोलणे करून द्यायचा. समोरची व्यक्ती नड्डा यांच्यासारखीच बोलत असल्याने फसगत होऊन काही आमदारांनी लाखोंची रक्कम तोतया नड्डा आणि पीएला दिल्याचीही माहिती आहे. नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्याशिवाय कामठीचे आमदार टेकचंद सावकर, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, बदनापूरचे नारायण कुचे व नंदुरबारचे आमदार राजेश पाडवी तसेच गोवा येथील प्रवीण आर्लेकर व नागालॅण्डचे बाशा मोवाचँग यांना मंत्रीपदाचे आमिष दाखवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ५३ वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ !

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.