लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारत मातृसत्ताक असल्याचे ऐतिहासिक संदर्भ दीपस्तंभा समान आहेत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत छत्रपती शिवरायांनी जिजाऊंच्या नेतृत्वात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तर, स्वातंत्रोत्तर काळात भारताने स्व.इंदिराजींच्या रूपाने जगाचे नेतृत्व करून दाखविले आहे.
म्हणून इतिहासातून बोध घेऊन स्त्री शक्तीचे संवर्धन करून मानवजातीचे अधिक कल्याण साधता येईल असे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र आणि मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्त्री शक्तीचा जागर’ या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलतांना प्रा.संदीप पाटील यांनी विविध क्षेत्रात प्रभावी कार्य करण्यासाठी सावित्रीमाई फुलेंचा आदर्श ठेऊन शिक्षणाची कास धरून तिमिरातून तेजाकडे कूच करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच माजी शिक्षण मंत्री कै.ना.सौ.शरदचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवाद करण्यात आल्यानंतर कु.निकिता बाविस्कर या विद्यार्थिनीने स्त्री-शक्तीचा गुणगौरव करणाऱ्या गीताचे गायन केले.
कार्यक्रमात प्रा.दीनानाथ पाटील यांनी समाजतील सर्व नीतिमूल्ये पाळायची जवाबदारी स्त्री-पुरुषांची सामूहिक असल्याचे सांगितले तर,प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात भयमुक्त समाज निर्मिती होण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही. टी.पाटील,उपप्राचार्य प्रा.बी.एस हळपे,पर्यवेक्षक प्रा.एस.पी.पाटील, आदी पदाधिकारींसह प्रा.सौ.माया शिंदे,प्रा.सौ.क्रांती क्षीरसागर,
प्रा.सौ.सुनिता पाटील,प्रा.सौ.संगीता पाटील,प्रा.कु.पठाण आदी. उपस्थित होते.
मानसमित्र समुपदेशन केंद्राचे समन्वयक डॉ.आर.आर.पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजन विषयक भूमिका मांडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कविता बोरसे हीने केले तर, आभार सहसमन्वयक प्रा.सौ.उज्वला पाटील यांनी मानलेत.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.मधुचंद्र भुसारे, प्रा.दत्तात्रय कर्दपवार, प्रा.योगेश पाटील,प्रा.मुकेश पाटील,प्रा.विशाल पाटील तसेच मानस मित्र समुपदेशन केंद्राचे विद्यार्थी सदस्य ज्ञानेश्वर जोशी, पवन पाटील, अजय भिल, योगेश सोनवणे, साक्षी पाटील, निकिता बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले.याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.


