Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात बोगस मतदानावरून ‘राडा’ तर धरणगावात शांततेत मतदान !
    एरंडोल

    जळगावात बोगस मतदानावरून ‘राडा’ तर धरणगावात शांततेत मतदान !

    editor deskBy editor deskApril 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी आज शुक्रवार २८ रोजी जळगाव जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असतांनाच गोंधळी गोंधळ घालण्यासाठी तयारच असल्याचा अनुभव बहुतांश मतदान केंद्रावर दिसून आला.

    दरम्यान जळगाव शहरात नूतन मराठा महािवद्यालयातील मतदान केंद्रावर हमाल मापारी मतदार संघातून बोगस मतदार मतदानासाठी आले असल्याचा संशयकल्लोळाने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया बंद करण्याची मागणी करण्यात आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक स्तरावर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मतदान प्रक्रिया पूर्ववत करीत जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ४० तर सायंकाळी मतदान संपेपर्यंतर सरासरी ०० टक्के मतदारांना मतदान केले.

    धरणगाव-एरंडोल बाजार समितीच्या मतदानाची आज मतदान सुरु झाले होते. यावेळी  जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार व राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आपल्या प्रमुख कार्यकर्त्येसोबत धरणगावात ठाण मांडून पाहायला मिळाले. यावेळी या निवडणुकीच्या निकालाकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. याठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे.

    जिल्ह्याच्या मुख्यालयी जळगाव बाजार समितीसाठी नूतन मराठा महािवद्यालयात सात बूथ केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अवघ्या एक दिड तासातच सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान बोगस मतदार मतदानासाठी आले असल्याची हाकाटी अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आली. यात त्यामुळे मोठया प्रमाणवर गोंधळ निर्माण झाला. दरम्यान मतदान प्रकि्रयाच थांबविण्याची मागणी या अपक्ष उमेदवार धुडकू सपकाळे व त्यांच्या समर्थकांनी केल्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली असल्याचे दिसून आले. जळगाव शहरातील नूतन मराठा केंद्राची वास्तू ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभेसह अन्य मतदान प्रकि्रयेसाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते. या ठिकाणी अगोदरच संस्थेवर हक्क असल्याच्या संचालकांच्या अंतर्गत वादामुळे परीसर वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यात बाजार समितीच्या निवडणूकी दरम्यान बोगस मतदार मतदानासाठी आले असल्याचा संशयकल्लोळ निर्माण होउन नवा वाद निर्माण झालं आहे. उपस्थित होउन मतदान प्रक्रियाच बंद करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली. तसेच संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कायदा सुव्यवस्थेसाठी तैनात पोलीसांकडून वेळीच हस्तक्षेप करण्यात आल्याने वाद टळला. यावल बाजार समिती साठी तीन मतदान केंद्रापैकी चौधरी कन्या शाळेतील मतदान केंद्रावर आ. शिरीष चौधरी, माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे तसेच उमेदवार आणि कर्तव्यावर तैनात पोलीस उपनिरीक्षक यांच्यात किरकोळ शाव्दीक वाद निर्माण झाला असल्याचा प्रकार घडला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.