Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदे गटातील या आमदाराला जीवे मारण्याची धमकी !
    क्राईम

    शिंदे गटातील या आमदाराला जीवे मारण्याची धमकी !

    editor deskBy editor deskApril 14, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था 

    राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचे सत्र सुरु आहे. यात आणखी एका आमदाराला धमकीचे निनावी पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत आहे ते पुन्हा आता एका नव्या चर्चेत आले आहे.

    संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. राज्यातील काही नेत्यांना थेट मोबाइलवर फोन, संदेशाद्वारे धमकी मिळाली. तर बोरनारे यांच्या नावाने नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्रातून त्यांना जीवानिशी मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर शिवसेनेत यामुळे खळबळ माजली आहे.

    आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी बंड केल्यानंतर त्यांनीही आधी सूरत आणि नंतर गुवाहटी गाठलं होतं. संभाजीनगरातील वैजापूर मतदार संघावर त्यांची पकड आहे. रमेश बोरनारे यांच्या घरी नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्राद्वारे त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बोरनारे यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती वैजापूर पोलिसांना दिली आहे. वैजापूर पोलिसांकडून सदर पत्र कुणी पाठवलं असेल, याचा तपास सुरु आहे.
    आमदार रमेश बोरनारे हे यापूर्वी अनेक कारणांनी चर्चेत आले आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड होण्यापूर्वी भावजयीलाच मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भाजपच्या कार्यक्रमाला गेली म्हणून आमदार बोरनारे यांनी त्यांना मारहाण केली होती, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती…
    काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारणार असल्याचा फोन पोलीस कंट्रोल रुमला आला होता. रात्रीच्या सुमारास आलेल्या या फोनमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. हा फोन पुण्यातून आल्याचे दिसून आले. पोलीसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने हा फोन केल्याचं उघडकीस आलं. मुंबई आणि पुणे पोलिसांच्या सतर्कतेने या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचणे सोपे झाले. तर नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आलेल्या धमकी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणारा जयेश पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. पुजारी याचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. बेळगाव जेलमधून सुटण्यासाठी जयेश पुजारीने मोठा प्लॅन आखला होता, अशीही माहिती समोर येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.