Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
    आरोग्य

    राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    editor deskBy editor deskApril 2, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    देशात पुन्हा एकदा कोरोनानं पुन्हा डोकं बाहेर काढल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, शनिवारी देशात 2995 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर शुक्रवारी 3,095 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

    आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 18,389 आहे. एकूण आकडेवारीच्या 0.04 टक्के आहे. कोरोनाच्या उद्रेकापासून आतापर्यंत देशात 4,47,22,605 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 4,41,73,335 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशातीच पॉझिटिव्हिटी रेट 98.77 टक्के आहे. तर दुर्दैवी बाब म्हणजे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5,30,881 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत दोन वर्षांत 2.2 अब्जाहून अधिक कोविड लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत लसीचे 2,799 डोस देण्यात आले आहेत. शनिवारी (1 एप्रिल) महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या 669 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 81,44,780 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1,48,441 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी राज्यात 425 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी 694 रुग्णांची नोंद झाली.
    गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.

    घाबरू नका, खबरदारी बाळगा
    कोरोनाता वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.
    दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या सूचना राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे धाकधूक वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा अशी सूचना महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सकडून ही सूचना करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    हळद, मेहंदी आणि कोरफड: नैसर्गिकरीत्या केस काळे करण्याचा सोपा फॉर्म्युला

    January 20, 2026

    वजन कमी करायचंय? दररोज एक बाजरीची भाकरी पुरेशी!

    December 10, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.