अमळनेर : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापूर्वी जळगाव जिल्हात सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळ आले असल्याने या वादळात ३५ वर्षीय तरून घरी जात असतांना एका ठिकाणी अंगावर झाडाची फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील संजय सागर धनगर (वय 35) हा तरूण 15 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास निभोरा येथे घरी येत असतांना जळोद ते अमळगाव च्या मध्ये वादळात त्यांच्या अंगावर झाडाची मोठी जाड फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली.
झाडाची फांदी पउून जखमी झालेल्या संजय यास अमळगाव ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून अमळनेरला डाँ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात हलविण्यात आले. त्याच्या पोटाला मुका मार लागल्याने लिव्हर डँमेज होवून त्याचा मूत्यू झाला. दरम्यान 16 मार्च रोजी दुपारी निंभोरा गावी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारवड पोस्टेला अक्समात मृत्यू दाखल असून तपास हे. काँ. सूनिल अगोणे करीत आहे.


