Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रस्थापितांनी शिवसेना संपविण्याचे सगळे प्रयत्न केलेत : आ. चंद्रकात पाटील
    जळगाव

    प्रस्थापितांनी शिवसेना संपविण्याचे सगळे प्रयत्न केलेत : आ. चंद्रकात पाटील

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 1, 2021Updated:October 1, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- शिवसेना ही बंडखोर संघटना आहे, घरातून ,कुटुंबातून ,पोलिसांकडून आणि इतर प्रस्थापित पक्षांकडून शिवसेना त्या काळात कशी संपेल असा सगळा प्रयत्न झाला. शिवसेनेचा एकही सरपंच, जि.प. व पं.स सदस्य किंवा आमदार की खासदार नसतानाही शिवसेना जिवंत ठेवली ती केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचारांनी.शिवसेनेला संपविण्याची वल्गना करणार्‍यांचे जनतेने गर्वहरण केले. मुक्ताईनगर तालुक्यात 30 च्या रात्री ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वांनी पुन्हा सक्रीय होण्याची साद घातली.

    मुक्ताईनगर शहरातील जुन्या काळात अतिशय खस्ता खाऊन शिवसेनेची ज्योत कायम तेवत ठेवणार्‍या जेष्ठ शिवसैनिकांची महत्वपूर्ण बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शिवनेरी या निवासस्थानी काल रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जुन्या व जेष्ठ शिवसैनिकांच्या अडीअडचणी व समस्यांसंदर्भात चर्चा झाली. तसेच आता मागे न थांबता शिवसैनिक व युवा सैनिकांच्या पाठीवर अनुभवाचा हात ठेवून घर तिथे शिवसैनिक राबविण्याची वज्रमुठ आवळण्यात आली.

    यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी बोलतांना सांगितले की त्या काळात शिवसेनेला वेगळे पडण्याचा प्रयत्न, केला गेला. शिवसेना ही बंडखोर संघटना आहे. ज्या लोकांनी शिवसेना उभी केली. खर्‍या अर्थाने त्या लोकांना आज अतिशय नम्रपणे एकत्रित बोलवून त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करण्याचा हितगुज करण्याचा विचार मनात आला म्हणून आज ही बैठक घेतल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

    याप्रसंगी दिवंगत जेष्ठ शिवसैनिक हिरा शेठ राणे, रमेश सापधरे, शांताराम कपले, सुरेश कपले यांची आवर्जून आठवण काढून त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला.अशा ज्या लोकांनी शिवसेना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उभी केली वाढविली खस्ता खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाहिले नसल्यावरही केवळ एकलव्या प्रमाणे एक नेता एक गुरू हे ब्रीद ठेवून काम केले अशा तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा असे म्हणत त्यांनी किमान आठ दिवसातून एकदा तरी शिवसेना कार्यालयात येऊन युवा शिवसैनिकांना तुमचे मार्गदर्शन करावे अनुभवाचा मायेचा हात प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठीवर ठेवावा तसेच येत्या पुढील काळात घर तेथे शिवसेना व शिवसैनिक हा उद्देश साध्य करण्यासाठी सोबत राहावे असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व जेष्ठ शिवसैनिकांना केले. या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

    या प्रसंगी व्यासपीठावर माजी तालुका प्रमुख प्रमोद देशमुख,तालुका प्रमुख छोटू भोई ,प्रफुल्ल पाटील, गोपाळ सोनवणे, शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे,प्रशांत टोंगे,सर्व नगरसेवक व शिवसेना व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.