Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रक पलटला एक ठार तर सहा गंभीर जखमी !
    क्राईम

    ट्रक पलटला एक ठार तर सहा गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskFebruary 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    तालुक्यातील वराड गावाच्या शेत शिवारात टरबूज भरून चोपडाकडे येत असताना शेतातील मातीवरून ट्रकचे चाक स्लीप झाल्याने अचानक एका बाजूला उलटला. या अपघातात ट्रकजवळ उभा असलेला साजीद मोहम्मद बागवान (३५, साने गुरुजीनगर, चोपडा) हा ट्रकखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सहा मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.
    घटनेचे वृत्त कळताच उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका, कर्मचारी, चोपड़ा नागलवाडी, वराड येथील अनेकजण घटनास्थळी पोहोचले. मदतकार्य करून तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला सारून केबिनच्या खाली दबलेल्या साजीद बागवान यास बाहेर काढले. ट्रकमध्ये बसलेले इतर ६ मजूरदेखील जखमी झाले आहेत. यामध्ये किरण मोरे (१७), लताबाई सोनवणे (३४), प्रवीण भिल्ल (२०), गणेश भिल्ल (१६), लताबाई भिल्ल (४०, रामपुरा, चोपडा), शफी फारूक बागवान (३४, केजीएन कॉलनी, चोपडा) यांचा समावेश आहे.

    मयत साजिद महमद बागवान हा अमजद खान तमीझ खान पठान ( मुस्तफा कॉलनी, चोपडा) यांच्या ट्रकवर (एमएच१८ / बीए३४८६) क्लिनर म्हणून काम करीत होता. तसेच गाडीवर चालक म्हणून शेख जाकीर शेख सलीम (पटवे अळी, चोपडा) असल्याचे समजते. साजीद बागवान हा वराड शिवारात टरबूज भरण्यासाठी ट्रकचालकासोबत गेला होता. गाडी टरबूजने भरून चोपडाकडे येत असताना ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन उलटला. त्यात क्लिनर साजीद बागवान हा गाडीखाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री मदतीसाठी नगरसेवक हुसेनखा पठाण, मुक्तार सरदार, अकिल जहागीरदार, शकील शेख, साबीर शेख, कुणाल महाजन, सागर ओतारी, अक्षय साळुंखे, नाना बारेला, चंद्रजित राजपूत, महेंद्र धनगर यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कॅन्टीनमधील समोशातून मुलांना उलट्या-चक्कर; दोन विद्यार्थी रुग्णालयात दाखल

    November 18, 2025

    आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय !

    November 18, 2025

    खळबळजनक : मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे रुळावर आढळला तरुणाचा मृतदेह !

    November 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.