Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : चार अक्षरासाठी मोठा सौदा ; राऊतांचा हल्लाबोल !
    क्राईम

    मोठी बातमी : चार अक्षरासाठी मोठा सौदा ; राऊतांचा हल्लाबोल !

    editor deskBy editor deskFebruary 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली आहे. गेल्या सहा महिन्या न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाहीये. ही डील आहे. हा सौदा आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे.

    माझी खात्रीची माहिती आहे….
    चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत…
    हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे..
    बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..
    देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.. pic.twitter.com/3Siiro6O9b

    — Sanjay Raut (@rautsanjay61) February 19, 2023

     

    संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केला. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी दोन हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील. मी खात्रीने सांगतो ही डील झाली आहे. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी 50 लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

    हा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. हा न्याय नाही. हे डील आहे. हा सौदा आहे. 2000 कोटी खर्च झाले. चिन्ह आणि पक्षाचं नाव विकत घेण्यासाठी किमान दोन हजार कोटी खर्च केल्याची माहिती त्यांच्या बिल्डरांनी मला दिली आहे. ते कुठे बसलेत ते सर्वांना माहीत आहे. आतापर्यंत दोन हजार कोटी खर्च झाले आहेत. मी माझ्या मतावर ठाम आहे, असं राऊत म्हणाले. हे सरकार खोक्यातून निर्माण झालं आहे. आज नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवलं गेलं आहेत. त्यांची अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे. ते मुंबईसह महाराष्ट्रही विकत घेतील. एका चिन्हासाठी ही रक्कम लहान नाही. शिवसेना या चार अक्षरांसाठी हा सौदा झाला आहे, असा दावा त्यांनी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.