Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आज होणार मतदान ; शिक्षक व पदवीधर संघात मोठी चुरस !
    राजकारण

    आज होणार मतदान ; शिक्षक व पदवीधर संघात मोठी चुरस !

    editor deskBy editor deskJanuary 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    राज्यातील अतिशय महत्वाची मानली जाणारी निवडणूकित नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तर येत्या 2 तारखेला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे या पाचही निवडणुकीत काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अधिकच हायटेक ठरली आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने अजूनही जाहीर पाठिंबा दिला नाही. तांबे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तांबे गुलाल उधळणार की पाटील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    सकाळी 8 वाजल्यापासून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. अमरावती विभागात एकूण 262 मतदान केंद्रे तर सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्रे आहेत. अमरावती विभागातील 2 लाख 6 हजार 177 पदवीधर मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी अमरावती विभागात 2 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत.
    अमरावती पदवीधर मतदारसंघात एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे रणजित पाटील तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात मविआचे धीरज लिंगाडे निवडणूक लढत आहेत. अमरावती पदवीधरसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातून मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी धुळे जिल्ह्यात एकूण 29 केंद्र आहेत. मतदानासाठी केंद्रावर मतदान साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी जलदजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 29 केंद्रावर मतदान साहित्य वितरत करण्यात आले. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे.

    तसेच या मतदान प्रक्रियेसाठी 205 पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडेल. अशी माहिती जिल्हाधिकारी जलाश शर्मा यांनी दिली. नाशिक पदवीधर मतदारसंघात मविआच्या शुभांगी पाटील, वंचितचे रतन बनसोडे आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात लढत होणार आहे. तांबे यांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला नाही. पण तांबे यांना विजयी करण्याचे आदेश भाजपने कार्यकर्त्यांना दिल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यासाठी औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील मतदान केंद्रही सज्ज करण्यात आली आहेत. महाविकास आघाडीकडून विक्रम काळे उभे आहेत. तर, भाजपकडून किरण पाटील लढत आहेत. प्रदीप साळुंखे हे राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

    नागपूर शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेसकडून सुधाकर आडबाले, शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून सतीश इटकेलवार मैदानात आहेत. तर अपक्ष उमेदवार म्हणून नागो गाणार हे निवडणूक लढत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    निवडणूक जिंकण्यासाठी राज्याचे वाटोळे; काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

    January 31, 2026

    सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर शरद पवार असमाधानी; ‘इतकी घाई का?’

    January 31, 2026

    धरणगाव तालुक्यात वादळ-पावसाचा कहर; रब्बी पिके भुईसपाट

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.