• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजपवर संजय राऊतांची जोरदार टीका !

editor desk by editor desk
January 19, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
भाजपवर संजय राऊतांची जोरदार टीका !

मुंबई : वृत्तसंस्था 

शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे. अशी टीका शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. राऊत भारत जोडो विषयी म्हणाले, भारत कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे. त्यामुळे शिवसेनेची पाऊले उमटली पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत सहभागी होऊ. 2 दिवस जम्मु काश्मिरला जाणार आहे. त्याठिकाणी हजारो काश्मिरी पंडीत सरकार विरोधात आंदोलन करत आहे. मी त्याठिकाणी जाऊन त्यांची भेट घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत विविध विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने आम्ही केलेल्या कामांचेच आज उद्धाटन होत असल्याची टीका होत आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, काश्मिरी पंडीतांसोबत चर्चा करणार आहे. विस्थापितांच्या शिष्टमंडळाला भेटेल. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेद्वारे ऐतिहासिक कार्यक्रम घेतला. साडेचार हजार किलोमीटरपेक्षा जास्त चालत प्रवास करणे हे सोप्पे नाही. त्यामुळे संपूर्ण देश मनाने आणि भावनेने जोडला पाहिजे. देशातील द्वेष आणि सूडाची भावना संपायला हवी. हा राहुल गांधींचा उद्देश आहे. आणि राजकीय मतभेद बाजूला सारुन आम्ही यात सहभागी होऊन पाठिंबा देणार.
संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधानांना विनंती केली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातून येताना बेळगावसह ज्या सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार सुरु आहे. त्या संदर्भात पंतप्रधानांनी तिकडच्या मुख्यमंत्र्यांना सूचना द्याव्यात. यापुढे मराठी बेळगाववासियांवर अन्याय होता कामा नये. पंतप्रधान आपल्या शहरात येत आहे. चांगली गोष्ट आहे. त्यांना कोणी विरोध करत नाहीये. त्यांचे स्वागत करायला हवे. शिवसेनेने महानगरपालिकेत ज्या कामांची पायाभरणी केली त्याच कामांचे उद्धाटन करण्यासाठीच प्रधानमंत्री येत आहे. अडथळे पार करत शिवसेनेने सुरु केलेल्या कामांना जी गती मिळाली त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला या कामांच्या उद्घाटनाची संधी आज मिळत आहे. शिवसेनेच्या कामांमुळेच त्यांना आज त्यांच्या प्रचाराचे भूमिपुजन करता येत आहे.
संजय राऊत म्हणाले, हे शिवसेनेचे यश आहे. आम्ही जी कामे केली आहेत. ती कामे मी मोजून दाखवू शकतो. आमचे जे माजी महापौर आहेत, सुनील प्रभु आहेत त्यांना विचारा. असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी यावेळी केला.

Previous Post

नवलसिंगराजे पाटील यांनी घेतली डॉ अक्षय पाटील याची भेट !

Next Post

जुन्या वादातून मुलासह आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल !

Next Post
जुन्या वादातून मुलासह आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल !

जुन्या वादातून मुलासह आईला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group