जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे जळगाव शहरामध्ये गल्लो गल्ली रस्ते आंदोलनला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहरात जिल्हा पेठ भागात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोरील रस्त्याची वाईट परिस्थिती खराब झाली आहे. दुकानदार आणी नागरिक धुळेने त्रस्त झाले आहेत, कंबर दुखीचा त्रास वाढला आहे. यासह शहरातील विविध समस्याबाबत आज मनसे आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांनी केले.
मनसेने नवीन रस्ता बनण्यासाठी पाठपुरवठा करित असून, महानगपालिका ला अजून जाग आली नाही तरी मार्केट समोरील रस्ते लवकरात लवकर झाले पाहिजे, न झाल्यास आता मनसे त्यांच्या स्टाईल ने जवाब विचारेल. तरीही रस्ते न झाल्यास जळगाव शहरातील नागरिक व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून आणखी मोठे आंदोलन उभारेल.
आंदोलन करतेवेळी मनसेचे जळगाव शहर महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. यावेळी उपस्थित जळगाव महानगर अध्यक्ष विनोद शिंदे जळगाव जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे जळगाव शहर सचिव महेंद्र सपकाळे, उपशहरअध्यक्ष ललित (बंटी) शर्मा तसेच महाराष्ट्र सैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते