धरणगाव : प्रतिनिधी
दिनांक 14 जानेवारी महसूल विभागामार्फत भरविण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत धरणगाव तहसिल कार्यालयातील चमूने सामाजिक समस्यांवर ‘माझ्या देशबंधावानो’ ही एकांकिका बसवून सामाजिक संदेश दिला.
यात महिला सबलीकरण,भारतीय संस्कृती आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर एकांकिका सादर केली. यात धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी शिवा नावाच्या तरुणाची अफलातून भूमिका सादर करून हा तरुण समाजातील जाचक गोष्टींवर बोट ठेवताना नाटिकेत दाखविण्यात आला.सोबतच धरणगाव येथील कर्मचारी पंकज शिंदे,संजय ब्राहमने,तलाठी भागवत पवार,वीरेंद्र सोनकांबळे,राहुल ढेरंगे,सचिन कलोरे,रोशनी मोरे,कांचन वाणी,कोतवाल धनराज भोई,राहुल शिरोळे,ज्ञानेश्वर माळी यांनी उत्तम भूमिका निभावल्या.
या एकांकिकेचे लेखन दिगदर्शन तहसीलदार देवरे यांनी केले आहे. सदर नाटिकेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील व जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी,ताहीसलदार आणि महसूल विभागातील कर्मचारी हजर होते.