जळगाव : प्रतिनिधी
३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये जळगाव पोलीस खेळाडूंची सात पदके प्राप्त करून चमकदार कामगिरी केली. दिनांक ७ जानेवारी 2023 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत पुणे येथे 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 या स्पर्धा पार पडल्या त्याकरिता जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक जळगाव श्री एम राजकुमार, सह अधिकारी अंमलदार यांचा संघ जळगाव जिल्हा स्थरीय व नाशिक विभाग स्थरीय स्पर्धा खेळून त्यात प्राविण्य मिळवून सर्वांची राज्य स्थरीय स्पर्धे करिता निवड झाली होती.
त्यातील पुढील नमूद पोलीस खेळाडू यांनी 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 या स्पर्धांमधील काही खेळांमध्ये ०१) संतोष सुरवाडे यांनी बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले, ०२) प्रशांत सोनार यांनी बॉक्सिंग मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. ०३) समीर सय्यद यांनी बास्केटबॉल मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. ०४) रवींद्र वंजारी यांनी शरीरसौष्ठव मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. ०५) जागृती काळे यांनी शरीरसौष्ठव मध्ये रौप्य पदक प्राप्त केले. ०६) पंकज रामचंद्र शिंदे यांनी वुशू मध्ये कास्य पदक प्राप्त केले. ०७) सुनील मोरे यांनी वुशू मध्ये कास्य पदक प्राप्त केले. अशी पदके प्राप्त करून त्यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड करण्यात येईल. सर्व स्पर्धकांचे मा. पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक (गृह) संदीप गावित व राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी अभिनंदन व कौतुक करून रोख बक्षिसे देवून पुढील स्पर्धांकरिता शुभेच्छा दिल्या.
तसेच पोलीस अधीक्षक जळगाव श्री एम राजकुमार यांनी पुणे येथे ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ यात झालेल्या ४२ किलोमीटर मॅरेथॅान स्पर्धेत सहभाग नोंदवून ४२ किलोमीटर मॅरेथॅान स्पर्धा पूर्ण केल्या बद्दल अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्री संदीप गावित यांनी पुष्पगुच्छ देवून जिल्हा पोलीस दला तर्फे अभिनंदन केले. वरील खेळाडू यांना स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा प्रमुख तथा पोलीस उप निरीक्षक सम्रत वाघ, पो.ह. ज्ञानेश्वर बागुल व पो.ह. मनोज सुरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले