• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

काय सांगता ! उर्फी जावेदला मिळणार संरक्षण

editor desk by editor desk
January 17, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य
0
काय सांगता ! उर्फी जावेदला मिळणार संरक्षण

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या महिन्यापासून मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ असा सामना रंगला होता त्यानंतर हा वाद राज्य महिला आयोगाच्या कक्षेत गेल्यावर रुपाली चाकणकर यांनी आता मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद हिला पुरेसे संरक्षण द्यावे आणि यासंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेद हिच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेदनेही राज्य महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

मुंबई पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. अर्जात उर्फी जावेद यांनी म्हटले आहे की, त्या सिनेक्षेत्राशी संबंधित असुन अनेक वर्षांपासुन फॅशन इंडस्ट्रिमध्ये काम करत आहेत. त्यांचे राहणीमान आणि दिसणं त्यांना व्यावसायिकदृष्ट्या आवश्यक आहे. असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायदयाकरिता किंवा वैयक्तिक प्रसिध्दीकरिता उर्फी जावेद यांना मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांवरुन जाहिरपणे दिल्या आहेत.

रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, चित्रा वाघ राजकीय व्यक्तित्व असल्याने त्या किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती अथवा समुहाकडून उर्फी जावेद यांच्यावर हल्ला होवू शकतो. त्यामुळे उर्फी जावेद यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांनी दिलेल्या धमक्यांमुळे अर्जदार यांना घराबाहेर पडतानाही भिती वाटत आहे. तसेच उर्फी जावेद यांच्यासाठी असुरक्षित वातावरण निर्माण होवून त्यांना मुक्तपणे वावरता येत नाही. म्हणून प्रकरणाची दाहकता निवळेपर्यंत त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी उर्फी जावेद यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, स्वच्छंद आणि मुक्त संचाराचा हक्क राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे. पुरोगामी विचारांच्या महाष्ट्राच्या राजधानी मुंबईत एका महिलेला असुरक्षित वाटणे, ही गंभीर बाब आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे उर्फी जावेद यांचा अर्जाबाबत मुंबई पोलीस आयुक्त यांनी तात्काळ कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार अहवाल तात्काळ सादर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

Previous Post

१०,१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: संवेदनशील केंद्रांवर पूर्ण वेळ थांबणार भरारी पथके!

Next Post

पुणे हादरल : १३ वर्षीय मुलीचे दुखू लागले पोट समोर आल सत्य !

Next Post
पुणे हादरल : १३ वर्षीय मुलीचे दुखू लागले पोट समोर आल सत्य !

पुणे हादरल : १३ वर्षीय मुलीचे दुखू लागले पोट समोर आल सत्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group