लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : हरियाणा येथील रोहतक येथे झालेल्या नॅशनल 7th स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील राज्यस्तरीय संघ,अथलेटिक्स खेळाडू सहभागी झाले होते त्यांनी कुस्ती स्पर्धेत 2 गोल्ड
मेडल,स्केटिंग स्पर्धेत 1 गोल्ड मेडल,अथलेटिक्स स्पर्धेत 1 सिल्व्हर व 1 गोल्ड मेडल संपादन करून घवघवीत यश मिळाले आहे .
नुकत्याच २-३ दिवसांपूर्वी रोहतक, हरियाणा येथे झालेल्या नॅशनल 7th स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील राज्यस्तरीय विजेते संघ तसेच अथलेटिक्स खेळाडू सहभागी झाले होते. हरियाणा येथे झालेल्या नॅशनल स्पर्धा खूप अटीतटीच्या झाल्या. त्यात कुस्ती स्पर्धेत 2 गोल्ड मेडल धरणगाव येथील सौरभ पवार आणि महेश वाघ (कोच – पै.संदीप कंखरे), स्केटिंग स्पर्धेत 1 गोल्ड मेडल जळगाव शहरातील यश चौधरी, अथलेटिक्स स्पर्धेत 1 सिल्व्हर सावदा येथील शुभम बाविस्कर आणि 1 गोल्ड मेडल अमळनेर येथील करण साळुंखे या सर्वांनी घवघवीत यश मिळविले. चोपडा येथील व्हॉलीबॉल संघाला ( कोच – योगेश शिरसाठ आणि क्षितिज सोनवणे) तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. यावेळी जिल्ह्यातील सर्व संघासोबत जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, झोनल इन्चार्ज व जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले, जिल्हा सचिव योगेश चौधरी, जिल्हा सहसचिव मानसी भावसार आणि जिल्हा समन्व्यक कोमल पाटील रोहतक, हरियाणा येथे उपस्थित होते. मागील 2 वर्षापासून जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या पाटील व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशनचे काम जळगाव जिल्ह्यात चालू आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी काम करत आहे. आज 2 वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि जिल्ह्यातील खेळाडूंना नॅशनल पर्यंत घेऊन जाता याला हा आनंद असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आहे. यापुढे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आठव्या स्टुडंट्स ओलंपिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.