Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात मद्यधुंद ट्रक चालवीत वाहनांना दिली धडक ; नागरिकांनी धुतला !
    क्राईम

    जळगावात मद्यधुंद ट्रक चालवीत वाहनांना दिली धडक ; नागरिकांनी धुतला !

    editor deskBy editor deskJanuary 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरात सोमवारी दुपारी आठवडे बाजार ते शासकीय तांत्रिक महाविद्यालयादरम्यान मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक चालवून एसटीसह तीन ते चार दुचाकींना धडक दिली. हा संपूर्ण थरार येथील नागरिकांनी अनुभवला दरम्यान, नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.

    मद्यधुंद अवस्थेत एक चालक ट्रक (एमएच.३४. एव्ही. १४५३) चालवत आठवडे बाजारकडून शिवतीर्थ मैदानाकडे येत होता. या रस्त्यावर त्याने सुरुवातीला रिव्हर्स घेताना एसटीला धडक दिली. त्यानंतर भरधाव ट्रक चालवत तीन ते चार दुचाकींना धडक दिली. काही दुचाकीधारकांनी ट्रक चालकाला शासकीय तांत्रिक महाविद्यालयाजवळ ट्रक अडवून चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.