नागपूर : वृत्तसंस्था
अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या करण्यात आल्यानंतर हि हत्या कशी झाली याबाबत पोलिसांना मोठा यश आला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात ३५ दिवसांपूर्वी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं रहस्य उलगडण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर नजीकच्या सातेफळ इथल्या जंगलात आरोपींना शोधण्यात आलं. अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या केली असल्याची बाब समोर आली आहे. तर आधी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, त्यानंतर ओळख पटू नये यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजी पंत इथल्या सत्याग्रही घाटात 35 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आणि तिच्या मृत्युचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं होतं. वर्धाच नाही तर इतर जिल्ह्यातील बेपत्ता महिलांचा सोटोजन पोर्टलवरुन शोध घेतल्यावर या घटनेतील आरोपीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने तिची हत्या केली. तसंच ओळख पटू नये यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाण्याचा प्रयत्न केल. तब्बल चाळीस दिवसानंतर उलगडलेल्या हत्येच्या रहस्यात यवतमाळच्या नेर परसोपंत इथला आरोपी पती मनीष भोसले आणि त्याचा साथीदार प्रवीण पवार यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील वर्षी 10 डिसेंबरला नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटापासून काही अंतरावर जंगलात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. भीमराव शिंगारे नावाच्या व्यक्तीने मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली होती. या प्रकरणाची वर्ध्यातील तळेगाव (श्यामजीपंत) पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मृतदेह सापडल्यानंतर पुढील 35 दिवसांच्या तपासानंतर वर्धा पोलिसांनी हत्येची उकल केली आहे.