Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगाव हादरल : २८ वर्षीय तरुणाचा खून
    क्राईम

    चाळीसगाव हादरल : २८ वर्षीय तरुणाचा खून

    editor deskBy editor deskJanuary 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका ठिकाणी दोन ते तीन जणांनी एका २८ वर्षीय तरुणांवर हल्ला करीत त्यांच्या गळ्यावर व पोटावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना दि,15 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. ऐन संक्रांतीच्या सणाला खून झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
    शहरातील पोदार शाळेजवळ निर्जनस्थळी 28 वर्षीय तरुणावर अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान खूनामागील नेमके कारण काय आहेे, हे समजून आले नाही. परंतू दोन गटातील वादामुळेच पूर्व वैमन्यसातून खून झाल्याची चर्चा शहरात आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पवार वाडीतील रहिवासी दिनेश ऊर्फ भावडू वाल्मिक जाधव(28) हा आपल्या दोन ते मित्रांसोबत शहरातील पोतदार शाळेजवळील निर्जनस्थळी उभा असताना, काही तरुणाचा त्यांच्याशी पूर्ववैमन्यासातून वाद झाला. यात दिनेश जाधव यांच्या पोटावर व गळ्यावर एकाने धारधार शस्त्राने सपासप वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
    घटनास्थळावरुन मारेकर्‍यांनी लागलीच पलायन केले. दिनेश जाधव याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. दिनेश जाधव हा परिवारात एककुलता एक मुलगा होता. त्यांची घरची परिस्थिती हालाकीची असून आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन परिवाराचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मिळाली आहे. आई-वडिलांची दिनेश यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतू वाईटसोबतीमुळेच दिनेशचा खून झाल्याची चर्चा शहरात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन गटात वाद होवून त्यात माजी नगरसेवकाचा मुलावर देखील चाकू हल्ला करण्यात आला होता. आता पुन्हा शहरात तरुणाचा ऐन संक्रातींच्या दिवशीच खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान दिनेश सोबत अजुन दोन ते तीन जणांना गंभीर मार लागला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून, पंचनामा केला असून पुढील तपास ते करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    वकिलावर प्राणघातक हल्ला प्रकरण : तिघांवर गुन्हा दाखल !

    February 22, 2026

    अमळनेरातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक !

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.