• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पतंग उडविताना तोल जाऊन विहिरीत पडला…१० वर्षीय मुलाचा मृत्यू

editor desk by editor desk
January 15, 2023
in अमळनेर, क्राईम, धरणगाव
0
पतंग उडविताना तोल जाऊन विहिरीत पडला…१० वर्षीय मुलाचा मृत्यू

धरणगाव :  प्रतिनिधी 

तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि , यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात . अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे .

येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन ( माळी ) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे . याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन ( माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता . याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला . यामुळे त्याचा मृत्यू झाला . अक्षय माळी हा पाचवीत शिकत असून तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले . मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती . यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे . मुलांनी पतंग उडवतांना सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे .

Previous Post

तब्बल पंचवीस वर्षांनी परतली या गावात लालपरी !

Next Post

जळगावात एकाच रात्री तीन घरफोडी !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावात एकाच रात्री तीन घरफोडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
राजकारण

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

July 20, 2025
नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !
राजकारण

नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !

July 20, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

धक्कादायक : विषप्राशन केलेल्या परसाडे येथील प्रौढाचा मृत्यू !

July 20, 2025
जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

July 20, 2025
नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!
क्राईम

नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!

July 20, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची ४८ हजारात फसवणूक !

July 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp