लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना धरणगावच्या मल्लने गोल्ड मेडल मिळाले त्याचा ततहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी घरी जाऊन सत्कार केला त्याला सर्व परीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले याबाबत धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी त्यांचे राहते घरी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यसाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.महेश ला कुस्तीची तयारी करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेशी चर्चा करून मदत करता येईल असा शब्दही दिला.
महेश ला नियमित सारवासाठी मॅटींग आवश्यक असून सदर मॅटिंग ची किंमत 3 ते 5 लाखापर्यंत येत असून डाएट व इतर बाबींचा खर्च ही न पेलवणारा असल्याचे महेशने सांगितले याप्रसंगी तहसीलदार देवरे यांनी धरणगाव शहरातील दात्यानां व प्रतिष्टीत नागरिकांना महेश च्या पुढील वाटचालीसाठी मदतीचे आवाहन केले आहे.
सदर बाब जिल्हाधिकारी जळगाव अभिजित राऊत यांना ही कळणार असल्याचे देवरे यांनी सांगितले.भविष्यातील विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील यशासाठी महेशला विविध सोयी मिळाल्यास धरणगाव चे नाव उंच होईल असे मत तहसीलदार देवरे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी लिपिक गणेश पवार,तलाठी अल्ताब पठाण हजर होते.