पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय विवाहितेचा ५० हजारासाठी सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात स्त्री अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावातील २४ वर्षीय विवाहिता मोनी आत्माराम पवार यांचा सासरच्या मंडळींनी तिला नेहमी चापटा बुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करीत तुझ्या माहेरून ५० हजार रुपये आण असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरचे मंडळी आत्माराम पवार, सायकाबाई पवार, रोहिदास पवार, आकाश पवार, अमोल पवार, राधाबाई राठोड, धारसिंग राठोड यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात स्त्री अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील हे करीत आहे.