जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील एका गावातून एका ३० वर्षीय तरुणाला अनोळखी दोन इसमांनी ६० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देत सांगत फसवणूक केल्याप्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथील रहिवासी नागेश्वर पाटील यांच्या घराजवळ दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन इसम येत सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देत असे सांगून त्यांच्याकडून तब्बल ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेत दिशाभूल करीत त्यांचे फसवणूक केली आहे याप्रकरणी त्यांनी कासोदा पोलीस स्थानक गाठत अज्ञात व्यक्तींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज कोळी हे करीत आहे