जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून अज्ञात व्यक्तीने १४ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील विटनेर शिवारातील एका फॅक्टरी जवळून १४ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने दि २४ डिसेंबरच्या सायंकाळी काहीतरी फूस लावून पळून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस स्थानकात धाव घेत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पुढील तपास सपोनी अमोल मोरे हे करीत आहे.