Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबाद नंतर जळगावतही खून का बदला खूनाचा प्रयत्न ; घरात शिरून ‘गेम’ करण्याचा  प्लॅन फसला
    आरोग्य

    नशिराबाद नंतर जळगावतही खून का बदला खूनाचा प्रयत्न ; घरात शिरून ‘गेम’ करण्याचा  प्लॅन फसला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 23, 2021Updated:September 23, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्ह्यात पिस्तुल फायरींग सारख्या घटना वाढत असून त्यावर आळा लावण्यात पोलिसांनी अपयश येत असून मोटर सायकलचे गुन्हेगार पोलिसांच्या हाथी लागत आहे मात्र पिस्तुल विक्री किंवा शहरात येण्यावर रोख लावण्यात पोलिसांना अपयश आले एका मागून एक घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे आज सकाळी कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोरांना यश आले नाही. तर एक हल्लेखोर हा घटनास्थळीच जखमी होऊन बेशुध्द झाल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे अगदी सकाळीच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास प्रारंभ केला आहे.


    नशिराबाद येथे भावाच्या खुनाचा बदला घेण्यात आला ही  घटना ताजी असताना दोन दिवसानंतर शहरातील कांचन नगरात ही खुनाचा बदला घेण्यासाठी सकाळीच घरात घुसुन फायरींग झाली यात 6 ते 7  राऊंड फायर झाले असून 4 घरात व तीन बाहेर झाले मात्र जे मारण्यासाठी आले त्यातील एक जण जखमी होऊन बेशुद्ध झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे

    काय आहे घटनेची पार्श्वभूमी

    गत नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी 4 नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शिवाजीनगरातील स्मशानभूमिजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८) याचा एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात खून झाला होता. राकेश सपकाळे हा रात्री साडेअकराच्या सुमारास स्मशानभूमी परिसरातून येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडविले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर मारेकर्‍यांनी चाकूने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर सपासप वार केले. त्यामुळे राकेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आधी झालेल्या भांडणातून काटा काढण्यासाठी राकेश सपकाळेचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.या खून प्रकरणी आकाश मुरलीधर सपकाळे (रा. कांचन नगर); गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. यातील संशयितांना नंतर जामीन मिळाला होता. यातीलच एक संशयित आकाश सपकाळे याच्यावर हल्लेखोरांनी आज सकाळी आठच्या सुमारास घरात शिरून हल्ला केला. प्राथमिक तपासात या खूनाचा आजच्या हल्ल्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    आकाश  सपकाळे याने प्रतिनिधी शी बोलताना सांगितले की,  सकाळी आठच्या सुमारास आकाश आणि त्याचा भाऊ हे घरात झोपलेले होते. त्यांचा भाऊ हा जागी होता. अचानक तीन-चार तरूण घरात आले व त्यांनी गोळीबार सुरू केला. आकाशच्या भावाने तात्काळ यातील एका हल्लेखोराला पकडून धरले. यामुळे ते नंतर गोळीबार करू शकले नाही. मात्र आकाशच्या करंगळीला गोळी लागल्याने त्याला जखम झाली. लागलीच हल्लेखोर घरातून बाहेर पडून दुचाकींवरून पळून गेले. मात्र त्यातील एक जण हा घराबाहेर धावतांना पायर्‍यांवरून पाय घसरून पडला. यामुळे तो तिथेच बेशुध्द होऊन पडला. त्याच्या बाजूलाच पिस्तल, मोबाईल आणि काडतूस पडले. त्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात चार जणांनी सुमारे सहा फैरी झाडल्याची माहिती मिळाली आहे.

    अवघ्या काही मिनिटांमध्ये हा थरार घडला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोक धाव घेत नाही तोच हल्लेखोरांनी पलायन केले. तर पोलिसांनी बेशुध्द पडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले असून शुध्दीवर आल्यावर त्यांची चौकशी सुरू केली आहे. शनिपेठचे निरिक्षक बळीराम हिरे आणि सहकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.