नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. बचावकार्य सुरू आहे. सध्या विमानतळ बंद आहे. या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ फोटो वरुन अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगराळा आदळले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ कोसळलेले प्रवासी विमान यती एअरलाईन्सचे असल्याचे सांगितले जात आहे.