• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
January 15, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य
0
मोठी बातमी : ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था 

ठाकरे गटाच्या महिला नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात सहकारी अधिकारी असलेले उदय पिंगळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत सहा इमारती आहेत. सन 2008 मध्ये पात्र झोपडधारकांना या इमारतीमधील घरांचे वाटप करण्यात आले होते. प्राधिकरणाकडे असलेल्या नोंदीनुसार किशोरी पेडणेकर या सोसायटीत झोपडीधारक नव्हत्या आणि त्यांना कोणतीही सदनिका वाटप करण्यात आली नव्हती. तरीदेखील पेडणेकर यांनी सदनिकेचा गैरफायदा घेतला असल्याची तक्रार पिंगळे यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीटमध्ये म्हटले आहे, झोपडपट्टीवासीयांची घरे बळकावल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एफआयआर दाखल. 14/1/2023 चा FIR क्रमांक 29 IPC कलम 420, 419, 465, 468, 471, 34 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर सदनिका बळकावणे आणि फसवणूक केल्याचे आरोप आहेत. किरीट सोमय्या यांनी एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. एसआरए प्रकरणी आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र मागील वर्षी उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे चौकशी झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, महापौरपदावर असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी हा घोटाळा केला. त्यांच्याविरोधात शिवसेनेने काय कारवाई केली? ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशन किशोरी पेडणेकर यांनी 2012 मध्ये केले होते. त्यावेळीपण बोगस सर्टिफिकेट जारी केले होते. 2017 मध्ये पुन्हा फसवणूक केली. संजय अंदारीचे नाव आणि किशोरी पेडणेकर यांचा भाऊ सुनिल कदमचा फोटो त्यांनी वापरला होता. कोट्यावधी रुपयांचे कोविड सेंटर्स त्यांनी उघडले. या सेंटर्समध्ये एकही रुग्ण भरती झालेला नाही.

Previous Post

संतापजनक : अल्पवयीन मुलीस ठेवले गरोदर ; गुन्हा दाखल !

Next Post

नेपाळमध्ये विमान कोसळले ; ३० जणांचा मृत्यू !

Next Post
नेपाळमध्ये विमान कोसळले ; ३० जणांचा मृत्यू !

नेपाळमध्ये विमान कोसळले ; ३० जणांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group