• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पतंगाच्या मागे धावताना बालकाचा मृत्यू !

editor desk by editor desk
January 14, 2023
in क्राईम, राज्य
0
पतंगाच्या मागे धावताना बालकाचा मृत्यू !

नागपूर : वृत्तसंस्था 

संक्रांतीनिमित्त आभाळ पतंगांमुळं भरुन गेलं आहे. तर दुसरीकडे एकमेकांच्या पतंग कापण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र ही कटलेली पतंग पकडण्यासाठीही जिवाची पर्वा न करता मागे धावणाऱ्यांच्याही अनेकवेळा अंगाशी येत असल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. असाच प्रकार कुंभारटोली परिसरालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकवर घडला आहे.शहरात नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर बेतला असताना पतंगाच्या मागे धावताना एका १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर घडली.

आकाशात सुरु असलेल्या पतंगांच्या लढती बघत कुंभारटोली परिसरातील मुले उभी होती. तसेच कट झालेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंग कटून जात असलेल्या दिशेने बेभाम पळत सुटायची. असाच एक पतंग कट झाला आणि त्याला पकडण्यासाठी मुलांचा टोळका पतंग जात असलेल्या दिशेने पळत सुटला. दरम्यान रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे रुळावरुन ही पतंग जाऊ लागला. हा पतंग आपण पकडू या जिद्दीने एक 13 वर्षीय मुलगा त्या दिशेने धावू लागला होता. मात्र या दरम्यान मार्गातून एक रेल्वे गाडी जात होती. मात्र पतंग लुटण्याच्या नादात या मुलाचे येणाऱ्या रेल्वेकडेही लक्ष गेले नाही. तेवढ्यात तो रेल्वेला धडकला आणि कोसळला. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे. यशवंत एक्स्प्रेसची जोरदार धडक लागल्याने ध्रुव धुर्वेचा जागीच मृत्यू झाला. घरातील लोक कामावर गेले असताना ध्रुवसोबतची घटना घडली आहे. ही घटना धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

जळगावात तरुणाने केला अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिककृत्य !

Next Post

दुखापतीवर मात देत पटकावला ‘महाराष्ट्र केसरी’

Next Post
दुखापतीवर मात देत पटकावला ‘महाराष्ट्र केसरी’

दुखापतीवर मात देत पटकावला 'महाराष्ट्र केसरी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group