लाईव्ह महाराष्ट्र न्युज : नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारी नाट्यानंतर सत्यजीत तांबे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आंदोलनाचे जुने फोटो व्हायरल होत आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोलपंपावरील फोटोला काळे फासले होते. याप्रकरणी तांबे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तांबे यांना भाजपने पाठींबा देऊ केला आहे. भविष्यात ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने सोशल मीडियात हे जुने फोटो व्हायरल करून या घटनेची आठवण करून देण्यात येत आहे.
इंधन दरवाढीविरोधात आक्टोबर २०१८ मध्ये म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या सरकारच्या काळात युवक काँग्रेसने राज्यभर आक्रमक आंदोलन केले होते. तेव्हा प्रत्येक पेट्रोल पंपावर मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक कंपन्यांकडून लावण्यात आले होते. ते फलक आंदोलकांनी टार्गेट केले होते. पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले होते. प्रदेशाध्यक्ष असलेला तांबे यांनी संगमनेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातीतील फोटोला काळे फासले होते.
चाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता
आंदोलनाला आक्रमक स्वरूप देण्यासाठी स्वत: तांबे यांनी त्यांच्या गाडीच्या आडोशाला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांकडून काळ्या ऑइलची बाटली घेतली. त्यातील ऑइल मोदी यांच्या चित्रावर फेकले होते. या प्रकरणी तेव्हा तांबे यांच्यासह चाळीस जणांविरुद्ध गैरकृत्य करण्याचा कट रचल्याचा गुन्हा पोलिसांच्या फिर्यादि वरून दाखल झाला होता.