मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप पक्ष जरी देश पातळीवर मोठा झालेला असला तरी पक्षातील नाराज असलेले नेते प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर असलेली नाराजी उघडपणे बोलून दाखवीत आहे. यावर आता ठाकरे गट भाजप मधील नाराज नेत्यासाठी पक्ष प्रवेशाची ऑफर देत आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. माध्यमांना ते म्हणाले की, पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय. मुंडेमुळे भाजप वाढला. भाजपमध्ये बरेच राजकारण चालते त्यावर मला बोलायचे नाही. सुनील शिंदे खूप छोटे आहे पण त्यांचे उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. पंकजा मुंडेंना मातोश्रीचा दरवाजा कधीही उघडा आहे, हे खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. माझी इच्छा आहे की, आमच्या कन्येने आमच्या पक्षात यावे. अशी खुली ऑफर सुनील शिंदेंनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज पंकजा मुंडेंना दिली.
चंद्रकांत खैरे म्हणाले “मराठवाड्यातील गावागावात भाजप पक्ष पोहोचवण्याचे काम नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्यावर भाजप अन्याय करत आहे. पंकजा मुंडे या खऱ्या युतीमधील खऱ्या वारस आहे, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले. आमदार सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचे मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होत आहे. हे आम्हाला दिसत आहे. पण हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, किरीट सोमय्या मूर्ख माणूस आहे, तो काहीही बोलतो. खोके कुणी कुठे दिले त्याची माहीती त्यांनी काढावी. तो फक्त शिवसेनेच्या मागे लागला, कुणाची सुपारी घेतलीय. का काहीही बडबड तो करतो. उठसुठ शिवसेनेच्या मागे लागतो.