धरणगाव : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शाळेचं स्नेहसंमेलन असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त आहे. स्नेह संमेलनातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी घडले जातात. त्यांना विविध क्षेत्रात आवड निर्माण होते सुजाण नागरिक तयार होतात.विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध कलागुण जोपासावेत असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते बाल कवी ठोंबरे विद्यालय आयोजित आनंद तरंग स्नेह संमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे हेमालालकाका भाटिया हे होते.
आज धरणगाव येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालय, धरणगाव आयोजित आनंद तरंग 2023 चे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट खेडाळू विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचेबहारदार सूत्रसंचालन के. एम. माळी सर यांनी केले.प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.रमेश महाजन यांनी केले. तर आभार सांस्कृतिक समितीचे सदस्या रजनीराणी पवार मॅडम यांनी मानले.
यावेळी माजी सभापती पी. सी. आबा पाटील, भाजपाचे सुभाषअण्णा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी ताई अत्तरदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, माजी नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, सरपंच भगवान महाजनसंस्थेचे संचालक ललित उपासनी, घनश्याम बयस, रघुनाथ चौधरी, रामनाथ पाटील, शोभाताई चौधरी, सुशील गुजराथी, ऍड राजेंद्र येवले, शांताराम महाजन, प्रदीप मालपुरे, शाळेचे मुख्याध्यापक जीवन पाटील सर, एस एस पाटील सर, पालक, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.