जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील महिलेची नापतोल ऑनलाइन शॉपिंग या कंपनीकडून चार चाकी लकी ड्रॉमध्ये लागल्याचे कुपन पोस्टाने पाठवून त्याच्यावर विविध चार्जेसच्या नावाखाली तब्बल ४ लाख ८० हजार २४२ रुपयात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी महिलेने सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील नवी पेठ परिसरातील रहिवासी असलेल्या तिलकपुले यांना नापतोल ऑनलाइन शॉपिंग या कंपनीकडून मारुती स्विफ्ट डिझायर गाडी लकी ड्रॉ मध्ये लागल्याचे कुपन त्यांच्या राहत्या घराच्या पोस्टावर पत्त्यावर पाठवून त्यातील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यात नमूद केले होते. या क्रमांकावर तिलकपुरे यांनी संपर्क साधला असता. त्यांच्यासोबत नितीनकुमार सिंग यांनी संभाषण करीत त्यांना सांगितले आपण नापतोल कंपनीतून बोलत आहे. त्यांच्याकडून व्हाट्सअप क्रमांक वर कंपनीचे बनावट नाव लोगो असे बनावट अनेक कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन करीत तुम्हाला चारचाकी गाडी मिळणार आहे.
तिलकपुरे यांच्याकडून वेगवेगळे चार्जेसच्या नावाखाली फोन पे च्या माध्यमातून तब्बल ५ महिने संशयित आरोपी नितीन कुमार सिंग यांनी वेळोवेळी एकूण ४ लाख ८० हजार २४२ रुपये उकळले त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची चारचाकी बाबत पुढील माहिती न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव शहरातील सायबर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी नितीन कुमार सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहे.