बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील एका २३ वर्षीय युवक काम आटोपून आपल्या घरी रात्रीच्या सुमारास जात असतांना एकाने त्याला अडवीत चाकूचा लावत त्याला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भिलवाडा येथील रहिवासी असलेल्या सचिन सुनील सोनवणे (वय २३) हे दि.१० जानेवारी रोजी आपल्या दुचाकीने भानखेडा ते बोदवड रोडने घरी जात असतांना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वसंता अशोक सोनवणे (रा. भिलवाडा) याने त्याच्या हातातील काठी मारत सचिनची दुचाकी रोडावर थांबविली. सचिन यांना चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील १ हजार ५०० रुपये जबरदस्ती काढून घेतले आणि तेथून पळून गेला. या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तुला वं सोडणार नाही, अशी धमकीहि त्याने यावेळी सचिन यांना दिली. या प्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.