जळगाव : प्रतिनिधी
जळगाव येथे नुकत्याच झालेल्या BRM सायकलिंग स्पर्धेत भुसावळच्या प्रिया रवी पाटील यांनी जळगाव ते भोकर परत जळगाव व तेथून जळगाव ते घोडसगाव परत रिटर्न जळगाव असे २०० किलो मीटरचे अंतर अवघ्या १२ तासात पूर्ण करून कौतुकास्पद कामगिरी केली.
भुसावळ शहरातील सेंट्रल स्कूल मधील शिक्षिका असलेल्या प्रिया रवी पाटील यांना लहानपणापासूनच सायकलिंगची आवड आहे. हा छंद जोपासत त्यांनी नोकरी व कौटुंबीक जबाबदारी देखील सांभाळत त्यांनी सायकलिंगचा सराव सुरू ठेवला. आज छंद जोपासण्यात तुमच्या आई-वडील त्यांच्या कुटुंबाने देखील प्रिया पाटील यांना प्रोत्साहित केले. याच आवडीतून प्रिया पाटील यांनी जळगाव येथे दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी Audax India Randonneur (AIR) ने आयोजित केलेल्या सायकलिंग स्पर्धेत त्यांनी सहभाग घेवून त्या भुसावळ तालुक्यातील पहिल्या महिला सायकलिस्ट बनवण्याचा मान त्यांनी मिळावीला आहे. स्पर्धेत सहभागी सायकलपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
१२ तासात पूर्ण केले २०० किलोमीटरचे अंतर
सायकलिंग स्पर्धेची सुरुवात आकाशवाणी चौकातून झाली. पूर्णपणे भारतीय बनावट असलेल्या सायकलचा वापर करून प्रिया पाटील यांनी जळगाव ते भोकर परत रिटर्न जळगाव वरून घोडसगाव ते जळगाव रिटर्न असे २०० किलोमीटर अंतर १२ तासात पूर्ण केले. त्यांचे जळगाव सायकलिंग असोसिएशनने विशेष अभिनंदन केले असून भुसावळ तालुक्यातील पहिल्या महिला सायकलिस्ट म्हणून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.