• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर आंबेडकर मध्यरात्री वर्षावर दाखल ; राजकीय चर्चांना उधाण

editor desk by editor desk
January 12, 2023
in राजकारण
0
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर आंबेडकर मध्यरात्री वर्षावर दाखल ; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील ठाकरे गटासोबत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची चर्चा सुरु असतानाचा राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात ११ रोजी मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री ही बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेवेळी शिंदे आणि आंबेडकरच होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे गुलदस्त्यात आहे. मात्र, आंबेडकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी सर्व दरवाजे उघडे ठेवले आहेत. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेलाही युतीसाठी आवाहन केलं होतं. आंबेडकर यांच्या या आवाहनाला शिवसेनेने प्रतिसादही दिला होता. या युतीच्या स्वरुपाबाबत चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महापालिका निवडणुका आणि विधान परिषदेत बहुजन समाजाची मते मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या युतीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, आता शिंदे-आंबेडकर यांच्या भेटीने या युतीला सुरुंग लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे, प्रकाश आंबेडकर हे भाजपसोबत जाणार नाहीत. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्यासोबत यावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काल मध्यरात्रीच्या भेटीत याच विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे वंचितच्या नेत्यांनी या भेटीला दुजारो दिला आहे. आंबेडकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. मात्र, इंदूमिलच्या स्मारकाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं वंचितच्या सूत्रांनी सांगितलं. मात्र, इंदूमिलची चर्चा करण्यासाठी मध्यरात्री जाण्याची गरज काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. ही भेट दिवसाही होऊ शकली असती. शिवाय इंदूमिलच्या स्मारकाबाबत बैठक होती तर या बैठकीला अधिकारी का उपस्थित नव्हते असा प्रश्नही विचारला जात आहे.

Previous Post

धरणगावात तरुणाची लाखो रुपयात फसवणूक !

Next Post

प्रिया पाटील यांनी अवघ्या १२ तासात सायकलने पार केले २०० किमीचे अंतर

Next Post
प्रिया पाटील यांनी अवघ्या १२ तासात सायकलने पार केले २०० किमीचे अंतर

प्रिया पाटील यांनी अवघ्या १२ तासात सायकलने पार केले २०० किमीचे अंतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group