धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय तरुणाची टेलिग्राम आयडी होऊन तब्बल तीन लाखात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील मराठी गल्लीत रहिवासी असलेले मूर्तुजा अहमद शेख इसहाक यांची एका महिन्यात त्यांच्या मोबाईलवर एका टेलिग्राम अँप वर एका नंबर वरून पैसे गुंतविण्याचे सांगून त्यात त्यांना कमिशन मिळेल असे भासवत त्यांच्याकडून तब्बल ३ लाख १० हजार ८६४ रुपये स्वीकारून त्या बदल्यात कुठलेही कमिशन न दिल्याने त्यांनी कस्टमर केअर मोबाईल नंबर वर फोन करून पैशांची मागणी केली असता पैसे न करता संबंधित तरुणाची फसवणूक झाल्याने त्यांनी लागलीच धरणगाव पोलीस स्थानकात धाव घेत टेलिग्राम अँप आयडी क्रमांक एका खातेधारका विरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे. याप्रकरणी पुढील तपास धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे.