चोपडा : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील एका २९ वर्षीय महिलेस संशयित आरोपीने पहिली पत्नी असतानाही तिच्यासोबत लग्नाचे आमिष देत अत्याचार केल्या प्रकरणी सात जणांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय महिलेस तब्बल पाच वर्ष लग्नाचे आमिष देत तिच्यावर सातत्याने अत्याचार करीत त्या अत्याचारातून तीन अपत्य झाल्याने त्या महिलेस पहिली पत्नी असल्याचे समजल्यावर तिची फसवणूक करीत तिच्याशी कटकारस्थान रचून सात जणाविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.