मुंबई : वृत्तसंस्था
रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू जखमी झाले आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 6. 30 च्या सुमारास बच्चू कडू रस्ता क्रॉस करत होते. त्या सुमारास समोरून येणाऱ्या एका दुचारीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली, यामुळे बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले यात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे.
याबाबत स्वतः बच्चू कडू यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.”, असे ट्वीट बच्चू कडू यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.



