जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसराच्या मुख्य रस्त्यावर १७ वर्षीय युवतीचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रिंग रोड परिसरात दिनांक १० रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एका ठिकाणी १७ वर्षीय युवती जात असताना तिच्या समोरून येणाऱ्या संशयित आरोपी राजेश विश्वनाथ भगत (वय ४२) रा.बिबा नगर याने युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश विश्वनाथ भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. किशोर पवार हे करीत आहे