अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून शेताच्या पत्राच्या शेड मधून लाखो रुपयाचा कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील लोन शिवारातील शेतकरी दिनेश निंबा साळुंखे यांचे शेताच्या पत्राच्या शेड मधून लाखो रुपयांचा कापूस यांनी एकत्र करून ठेवलेला होता. दिनांक ९ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी कापसाची पाहणी करून घरी गेले होते. त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील सालदार संतोष पाटील यांनी त्यांना फोन करून सांगितले की शेडच्या मागील दरवाजा उघडा असून व ठिकाण त्या ठिकाणी कापूस पडलेला दिसून येत आहे. याबाबत त्यांनी लागलीच शेतात धाव घेत बघितलं असता त्यांच्या पत्राच्या शेडमधून २० ते २२ क्विंटल कापूस सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत त्यांनी मारवड पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.