लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर विरुद्ध बाजूच्या टोळक्याने आज नशिराबाद जवळ सायंकाळी गोळीबार आणि चॉपर हल्ला केल्याने एक जण ठार झाला असून एक जखमी झाला आहे यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
या घटनेत एक ठार तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दाखल करण्यात आले असून मयताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जळगाव येथे आणण्यात येत आहे.
भुसावळ येथील खुनाच्या खटल्यामधीलधम्मप्रिय मनोहर सुरळकर व मनोहर सुरळकर या आरोपींना जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर उर्वरित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते भुसावळला दुचाकीने परतत असतांना त्यांना अज्ञात मारेकर्यांनी रोखले. त्याच वेळी त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी चोपरने आणि बंदुकीने हल्ला चढवत धम्मप्रिय सुरळकर जागीच ठार झाला आहे तर मनोहर सुरळकर हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीसांचा फौज फाटा पोहोचला आहे. मारेकऱ्यांचा तपास पोलीस करीत आहे.
या घटने मागील घटना
भुसावळ येथील पंचशिल नगर भागात पूर्ववैमनास्यातून अल्पवयीन युवकाच्या डोक्यात रॉड मारून त्याचा खून केल्याची घटना ११ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. फिर्यादी शेख समीर शेख जाकीर (रा. पंचशील नगर, मदिना मशीद जवळ भुसावळ) शेख समीर शेख जाकीर हा भुसावळ रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विक्री करायचा. त्यांच्या गल्लीतील रहिवासी धम्मा सुरळकर, समीर उर्फ कल्लु बांगर, अश्विन उर्फ गोलू बांगर, शुभम खंडेराव यांच्याशी वाद झाले होते. त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली होती. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरु होते. ११ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजेला मदिना मशीद जवळ मोहम्मद कैफ यास शिवीगाळ करू लागले. तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. हातातील लोंखडी रॉडने मोहम्मद कैफ यास डोक्यात मारून जीवे ठार मारले. अशी फिर्याद मयताचा भाऊ याने दिल्यावरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.