मुंबई : वृत्तसंस्था
खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी एक शेर ट्विट केले आहे.
‘मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए… नसीब बदले या ना बदले,वक्त जरुर बदलता है’, अशा मजकूराचा हा शेर आहे. कोर्टाकडून अपेक्षित अशा गोष्टी घडणार का हे पाहवं लागणार आहे. मात्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.