Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उर्फिने वाघांचा पुन्हा वाद ; तर कधी सासू…
    क्राईम

    उर्फिने वाघांचा पुन्हा वाद ; तर कधी सासू…

    editor deskBy editor deskJanuary 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलंय. उर्फीनं केलेलं ट्विट, उर्फीवरुन चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात सुरु झालेला वाद, त्या वादात सुप्रिया सुळेंनी मारलेली उडी यामुळं प्रकरण अधिकच चिघळलंय.

    कधी चित्रा वाघ जी, कधी चित्रू, तर कधी सासू, मॉडेल उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसिला चालूच ठेवलाय. उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना ट्विट करुन डिवचलं. आणि चित्रा वाघ यांच्या संतापाचा पारा पुन्हा चढला. काही दिवसांपूर्वी उर्फीनं हा नंगानाच सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. नंतर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्याला कपड्यांची अॅलर्जी असल्याचा दावा केला होता. कपड्यांची अलर्जी असल्याचा दावा उर्फीनं केल्यानंतर चित्रा वाघ यांनी अॅलर्जीच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिलाय.

    एकीकडे उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर यांच्यातही संघर्ष सुरु झालाय. महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांनी उत्तर दिल्यानंतर चित्रा वाघ यांचा अभ्यास कमी पडत असल्याचं वक्तव्य चाकणकरांनी केलं होतं. चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातला वाद थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना आवाहन केलं होतं. त्यालाही चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय.तोकडे कपडे घालण्याच्या मुद्द्यावर उर्फी जावेद ठाम आहे. उर्फीला धडा शिकवण्यावर चित्रा वाघ ठाम आहेत. आणि चाकणकर-वाघ यांच्यातल्या वादात माघार घ्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळं उर्फीचं हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हेच पाहावं लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.