एरंडोल : प्रतिनिधी
परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार एरंडोल/धरणगाव तर्फे पिंपळकोठे ता.एरंडोल येथे जळगाव जिल्हास्तरीय एक दिवसीय सहज कृषी कार्यशाळेचे चे आयोजन करण्यात आले.
या सेमिनार मध्ये नागपूर येथील सहज कृषी चे राज्य समन्वयक श्री मोहन जोशी यांनी विज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात सहजयोग पध्दतीने शेती कशी करावी ? या बाबत मार्गदर्शन केले.कृषी उत्पादनात वाढ, त्यांची निगा आणि पंचमहाभूत तत्वांचा उपयोग सहज कृषीमध्ये कसा केला जातो? हे प्रात्यक्षिकाद्वारे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून कृषी क्षेत्रात सहजयोग पद्धतीने शेती करण्याची गरज का निर्माण झाली? याबद्दल सांगितले.
सामूहिक पिकांना चैतन्य प्रदान करून आपल्या गावात एक वातावरण निर्मिती करून नवीन साधकांना जोडून घेण्याचे आवाहन केले.
आपल्या शेतातील पीक सहज कृषी तंत्राद्वारे लोकांना आकर्षण वाटावे असे तयार करून त्याद्वारे सहज कृषी व सहज योग प्रसारासाठी कार्य करावे असे आवाहन केले.
तर अकोला येथील श्री पंजाबराव बिहाडे यांनी मातीतील कार्बन तत्व कमी का होत आहे? आणि त्यासाठी सहजयोगा द्वारे आत्म्याच्या बळावर शेती करुन आपण आपल्या शेतातील पिकांना परमचैतन्य देऊन उत्पादनात वाढ कशी करु शकतो? मानवाला मन असते मात्र वनस्पती ह्या अहंकार विरहित असतात. त्या चैतन्याला प्रतिसाद देतात आणि सकस ताकदवर आणि स्वादयुक्त पिक आपण घेऊ शकतो. आणि म्हणूनच आपण सहजयोगा द्वारे सहज कृषी करुन प्रगती साध्य करू शकतो. या वेळी नविन आलेल्या शेतकरी बंधु ना आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला, त्यांनी सहज कृषि कशी करावी याचे ज्ञान प्राप्त केले व सहज कृषि करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील सहजयोग परिवारातील जिल्हा प्रमुख श्री भिकेश सराफ, सुरेंद्र कदम भुसावळ, एरंडोल येथील श्री अनिल आबा चौधरी, धरणगाव येथील सहज कृषीचे जिल्हा समन्वयक हिंम्मत दादा पाटील व पिंपळकोठा येथील बाळू पाटील सर ,व बडगुजर दादा आणि जिल्ह्यातील शेतकरी सहजयोगी बंधु भगिनी उपस्थित होते.