• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ना.गुलाबरावांना गुवाहाटीत ॲम्बुलन्समध्ये…मुख्यमंत्र्यांची कबुली !

editor desk by editor desk
January 9, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
ना.गुलाबरावांना गुवाहाटीत ॲम्बुलन्समध्ये…मुख्यमंत्र्यांची कबुली !

जळगाव : प्रतिनिधी 

अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.८ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बडगुजर समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी भाषणात त्यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं तेव्हा शिंदे गटाचे आमदार आपल्यासोबत कसे आले याबाबत थोडक्यात भाष्य केलं. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्यासोबत जायला खूप अडचणी आल्या. ते अक्षरश: ॲम्बुलन्समध्ये बसून आले. तसेच गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना माहित आहे ते कसे आले, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

“आम्ही धाडसाने निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हतं. आम्ही केले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. “बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्वाची आहे. आपण सर्व बडगुजर एकत्र केले तर गुजरची किती मोठी ताकद होईल”, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.
“आमदार किशोर पाटलांनी आग्रह केला अधिवेशनाला आलंच पाहिजे. आमदार गिरीश महाजन आपला खेळाडू माणूस आहे. सर्व खेळ खेळणारा माणूस आहे. परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्तुती केली. “आचारसंहिता असल्याने मी एवढेच सांगतो वस्तीगृहाचा विषय एवढा मोठा नाही. समझनेवाले को इशारा काफी है”, असं शिंदे म्हणाले. “सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर. पण मी म्हणतो कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस! आपल्या राज्याला केंद्राचा देखील मोठा पाठिंबा आहे. केंद्र सरकारने आपल्याला दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्राचा देखील आमच्या सरकारला पाठिंबा आहे. म्हणून त्यांच्याशी संबंध झोपासावे लागतात”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“मला शेतकऱ्यांविषयी फार प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्याचा देखील जीवनमान बदलला पाहिजे. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हे सरकार आहे. अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय होत आहे. 30 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर करणे हा देखील रेकॉर्ड आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय”, असंही शिंदे म्हणाले.

Previous Post

चोरट्यांनी मारला मोबाईलवर डल्ला ; गुन्हा दाखल !

Next Post

जीवन समृद्ध आणि निर्व्यसनी करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार अंगी बाळगा ! – ना. गुलाबराव पाटील

Next Post
जीवन समृद्ध आणि निर्व्यसनी करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार अंगी बाळगा ! – ना. गुलाबराव पाटील

जीवन समृद्ध आणि निर्व्यसनी करण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार अंगी बाळगा ! - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group