शहरातील चित्रा चौक परिसरातील एका दुकानातून पाण्याच्या मोटारची चोरी झाली होती. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येऊन प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपस सुरु असल्याने त्यातील एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पाण्याच्या मोटार सह चोरून नेलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त केली आहे.
जळगाव शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग प्लॉट नंबर १६९ येथे जय लहरी ट्रेडर्स या दुकानाचे शटर चे कुलूप तोडून आत प्रवेश करून 3,200/- रुपये किमतीची एक शाप कंपनीची एक एचपी ची पाण्याची मोटर 2) 1,800/- रूपये किमतीची एक शार्प कंपनीची एक एचपी ची पाण्याची मोटर 3) 60,900/- रुपये किमतीची गन मेटल अम्पेयर बुच कोपर लॉन्स व पितळाचे N RV 4) 3,000/- रुपये किमतीचे एक पवना इंची ब्रांडेड पाईप बंडल 5) 4000/- रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी j5 prime मोबाईल फोन असा सुमारे 72 ,900 /- रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने हेमंत नंदलाल रंगलाली वय 50 व्यवसाय व्यापार राहणार टेलीफोन नगर साने गुरुजी कॉलनी मागे जळगाव यांनी दिनांक 02/01/ 2023 रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येऊन फिर्याद दिल्याने जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 02/2023 भावी कलम 380 454 457 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या आदेशाने पोहेकॉ गणेश मधुकर पाटील यांच्याकडे दिला असता सदर गुन्ह्यात गुप्त माहितीदारांमार्फत पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख व पोहेका सलीम तडवी यांना माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच सदरची हकीकत प्रभारी सपोनि, किशोर पवार यांना सांगून त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांचे नेतृत्वात पोहे का 25 34 सलीम तडवी पोहेका गणेश मधुकर पाटील, पोना जुबेर तडवी, पोका समाधान पाटील, पोका अमित मराठे, पोका नरेंद्र दिवेकर, पोका केतन सूर्यवंशी यांचे पथक तयार करून भीलवाडी परिसरात राहणारा विशाल उर्फ अस्टिन युवराज सोनवणे राहणार पावर हाऊस जवळ भीलवाडी जळगाव याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन दोन अल्पवयीन साथिदार यांच्याशी संगत मताने सदरच्या गुन्हा केल्याच्या तपासात निष्पन्न आहे सदर आरोपीत यांच्याकडून वरील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुन्हात वापरले वापरलेली होंडा कंपनीची ड्रीम युगा नियो मोटरसायकल क्रमांक MH 19 CG 6105 काळ्या रंगाची असा एकूण 1,05,000/-रुपये किमतीचा 100% मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास पोहेका गणेश पाटील करीत आहेत.