भडगाव : प्रतिनिधी
समाजात आपण नेहमी बघत असतो कि मुलीसोबत नेहमी दुजाभाव केला जात आहे. तर काही घरात मुलगी आणि मुलामध्ये फरक पडला जावून मुलीला नेहमी दुय्यम स्थान दिले आहे. पण कधी ना कधी मुलगा जे काम करू शकत नाही ते काम मुलगी करून दाखविते त्यावरून समाजात लक्षात येत असते कि मुलगी सुद्धा तितकीच आपल्याला महत्वाची आहे. अशा अनेक घटना घडल्या असतात. अशीच एक घटना भडगाव तालुक्यात घडली आहे. आईच्या निधनानंतर भाऊ नसल्याने मुलीने आईला अग्निडाग दिला आहे.
भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील श्री शांताराम भास्कर बिरारी यांच्या लहान बहीण सौ. सुनंदाबाई संभाजी पाटील यांचे दिनांक ७ जानेवारी रोजी रात्री ठीक ८ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा जुवार्डी येथून दी. ८ रोजी सकाळी 10 वाजता निघाली. त्या शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील रहिवाशी असुन माहेरी जुवार्डी येथे २० वर्षापासून सहकुटुंब वास्तव्यास होत्या त्यांच्या पश्चात पती दोन मुली नातवंडे ०३ भाऊ असा परिवार आहे. मृतात्म्यास त्यांची लहान मुलगी नामे सौ. दिपाली पाटील यांनी आपल्या आईचे अंत्यसंस्कार करून भावाची कमी सुद्धा भरून काढली आहे.