लाईव्ह महाराष्ट्र: जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावातील तितुर नदीत पोहायला गेलेल्या दोन संख्या भावाचा बुडून मृत्यू झाला असून दुसरी घटना जामनेर तालुक्यातील जांभूळ गावामधील आई वडील बाहेरगावी गेले असता खेळता खेळता शेतातील केटी वेअर बाधाऱ्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला.
ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात दुर्दैवी घटना घडली आहे.तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.वाघळी गावालगतच्या कमलेश्वर के.टी वेअर बंधाऱ्या जवळ ही घटना घडली आहे.साहिल शहा शरीफ शहा फकीर आणि आयन शहा शरीफ शहा फकीर हे दोघे भाऊ तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते.नदीत पोहत असतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.चौदा पंधरा वर्षाच्या या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाघळी सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी नदीच्या पात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला.संध्याकाळ पर्यंत फक्त आयान चा मृतदेह हाती लागला असून साहिल शहा याचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती आहे.दोघांच्या पश्चात आई वडील एक विवाहित तर एक अविवाहित बहिण आहे.या घटनेची चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असून मुलांचे वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात.
तर दुसरी घटना जामनेर तालुक्यातील पहूर गावाजवळ असलेल्या जांभूळ गावापासून जवळच थोड्या अंतरावर नितीन एकनाथ जोशी आणि गोरख एकनाथ जोशी हे दोघे सख्खे भाऊ राहतात.जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील मूळचे रहिवासी असलेले हे भाऊ मजुरी तसेच भिक्षुकी करून आपला चरितार्थ चालवितात रविवारी जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी नितीन जोशी हे त्यांच्या पत्नीसह गेले असताना त्यांची ९ वर्षांची मुलगी पायल नितीन जोशी आणि त्यांचे भाऊ गोरख जोशी यांचा ६ वर्षांचा मुलगा रुद्र गोरख जोशी हे दोघे चुलत बहीण भाऊ खेळत खेळत दुपारच्या सुमारास घरापासून जवळच अंतरावर सुभाष रामदास शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या केटीवेअर बांधापर्यंत गेले.
खेळता खेळता दोघांचा तोल गेल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारची वेळ असल्याने चिमुकल्यांना वाचविण्यासाठी त्यावेळी कुणीही उपस्थित नव्हते. सहज म्हणून मयत रुद्रचे मामा मुकुंदा हरी जोशी केटीवेअर बांधापाशी आल्यावर त्यांना दोघा मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी लगेचच मुलांच्या आई-वडिलांशी संपर्क केला. चिमुकल्या पायल आणि रुद्रचे मृतदेह पाहून आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला . घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे , हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेऊन याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.